तृप्त

तृप्त म्हणजे कोण?

या संबंधात गीतेतील एक वचन समोर आले ते असे –

तृप्त म्हणजे नित्य – तृप्त – निराधार,

न राखे फळा वासना,

गेला गढूनी कर्मात तरी, काही करी इच्छा।

असा जो निरिच्छपणे कर्म करतो, तो तृप्त होय.

भुकेलेल्या यथेच्छ आवडीचे भोजन द्यावे व त्याने ढेकर देत उठावे, हे तृप्ततेचे लक्षण होय.

असा तृप्त माणूस संयमी असतो, विवेकी असतो. किती खायचे कुठे थांबायचे याचे ज्ञान त्याला असते.

उगाच मिळते म्हणून आणखी घ्यावे, ही त्याची भावना नसते.

तो जे आपल्या पदरी पडते ते पवित्र करुन घेतो. समाधानात असतो.

प्रपंचात काम, क्रोध, माया, लोभ यांचे अति सेवनाने मदांध झालेेली मंडळी समाजात कलह माजवितात. तर त्यावर ताबा मिळविणारे साधक शांत जीवन जगतात.

तृप्त माणसे काम, क्रोध, मोह या नरकाचे वाटेकडे कधी फिरकत नाहीत.

तृप्त माणूस वैर-द्वेष या पासून अलिप्त असतो. त्यामुळे त्याला युद्ध भुमीवर जावे लागत नाही.

त्याच्या समोर हा माझा, तो तुझा असा भाव नसतो. म्हणून तो प्रपंचात तृप्त असतो.

जेष्ठ नागरिक प्रपंचाच्या तिसर्‍या टप्यात आलेली मंडळी आहात. प्रपंच चांगला करुन तुम्ही तृप्त झाला आहात. आता आणखी हाव मनात ठेवू नका.

कुठे थांबायचे हे लक्षात घ्या व तसे वागा. तुम्ही जीवनांत तृप्त व्हाल, आनंद मिळवाल.

परमार्थात पण षड्रिपुशी सामना करत त्यांचेवर विजय मिळवत साधक तृप्त भावनेने परमेश्‍वराचे चिंतन मनन भजन, कीर्तन करीत असतो त्याचे चेहर्‍यावर तृप्त भाव दिसून येतो.

अशा तृप्त साधकाची परमेश्‍वराला तहान असते.

ती तहान आपण भागवावी व प्रपंचातून परमार्थात तृप्त भावाने जावे, ही इच्छा !

2 Comments

  • शीला केतकर
    Posted October 6, 2022 2:16 pm 0Likes

    मनुष्याचे हाव कधीही संपत नाही. मरेपर्यंत त्याला काही ना काहीतरी हवेच असते. परंतु ही स्थिती साधनेने नाहीशी होऊन म्हणजेच भजन नामसंकीर्तन नामस्मरण यामध्ये जो सदैव रंगून जातो आणि कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही त्यालाच ही स्थिती प्राप्त होते आणि त्याला तृप्ततेची ढेकर येते
    डॉक्टर साहेब तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. ते आचरणात आणणे माणसाला फार अवघड जाते. त्यामुळे तृप्ततेची ढेकर फारच थोड्या माणसांना येते.

    🙏 राम कृष्ण हरी🙏

  • Sulbha bhandari
    Posted October 7, 2022 12:56 am 0Likes

    तृप्त भावना किंवा समाधानी- आनंदित जीवन जगणे, हे जीवनाचे ध्येय नसावे तर तसा जीवन क्रम असावा.
    तृप्ति/ समाधान भाव ह्या नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी इच्छित वस्तु, परिस्थिति, काल प्राप्त होणे सर्वार्थाने सर्वांसाठी शक्य आहे काय? तेव्हा जैन सिद्धांतानुसार समता भाव, बौद्ध विचार धारेतील साक्षी भाव उपयोगी पडेल. प्राप्त परिस्थिति स्वीकारुन त्यामध्येच आनंदी राहणे.
    सामाधानी असणे म्हणजे काही ध्येय नसणे किंवा इच्छा नसणे असे झाले तर जीवनातील प्रगतीचे किंवा जगण्याचे प्रयोजन राहणार काय? पण कोठे थांबावे से व्यक्तिसापेक्ष असले तरी निच्छीत केलेले असावे.

    काका नी तृप्ती बद्दल खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगीतले आहे.

    धन्यवाद !

Leave a comment