पुरुषोत्तम

पुरुषा मध्ये श्रेष्ठ, पराक्रमामध्ये श्रेष्ठ तो पुरुषोत्तम होय. पुराणापासून आपण असे पुरुषोत्तम पहात आलो आहोत. प्रभु रामचंद्रांना पुरुषोत्तम मानले आहे.

आपल्या प्रवचनाची सुरवात संतांपासून झाली व आज श्रेष्ठ पुरुषांचे स्मरणाने आपण प्रवचनाची शताब्दी करत आहोत.
पुरुषोत्तम म्हणजे – जो मनाला स्वच्छ ठेवतो, प्रामाणिकपणे व्यवहार करतो, ज्याचा आपणाला सतत आधार घेत असतो.

घर बांधताना, एकावर एक स्लॅब टाकताना मजबूत आधार आपण पहातो व त्यांच्या आधारावर मजल्यावर मजले उभे करतो.

सर्व ठिकाणी आधारावरच सर्व व्यवहार चालू असतात. तो आधार मजबूत असणे गरजेचे असते.

या ठिकाणी पुरुषोत्तमाची आठवण होते. त्या पुरुषोत्तमाचे आधारावर आपण आपली मानवी संस्कृती खंबीरपणे उभी असलेली हीच संस्कृती आहे.

परमार्थात पण अशा आधाराची गरज असते. ते आधार आपण शोधले पाहिजते. ते पुरुषोत्तम डोळ्या समोर ठेवून परमार्थाची वाटचाल आपण केली पाहिजे.

अशा पुरुषोत्तमाचा आधार घेवून आपण परमार्थाची इमारत भक्कम केली पाहिजे.

पुराणात पण द्रौपदीला पुरुषोत्तम श्रीकृष्णाचा आधार होतो. त्यामुळे तीची आर्त हाक ऐकूण कृष्णाने तिला वस्त्रे पुरविली. तिची लाज राखली.

ज्याचे जवळ पाप वासना नाही. ज्याची दृष्टी दूसर्‍याचे दोष पहात नाही. निंदा नालस्ती ऐकत नाही, ज्याच्या वाणीमध्ये सतत नामस्मरण असते, तो पुरुषोत्तम जाणावा.

त्याला मी कोटी कोटी वंदना देतो. त्याचाच आपणाला खरा आधार असे वाटते. अशा पुरुषोत्तमाची संगत सेवा सतत घडावी.

Leave a comment