धर्मस्थळे

धर्म म्हरजे काय? तो कुठे टिकवला जोतो. तेथे कोणाचे अधिष्ठाण आहे. तेथील वातावरण कसे आहे. या गोष्टींची पहाणी स्थळे पहाताना आपण करतो.
अशी स्थळे विविध प्रकारची आपल्या नजरेत येतात. त्यातला धर्मस्थळे हा एक प्रकार आहे. काही प्रेक्षणीय स्थळे असतात. तेथे सृष्टीचे सौंदर्य विलोभनीय असते. काही तीर्थक्षेत्र असतात, तेथे तिर्थंकरांनी वास केलेला असतो. तर प्रपंच करीत असताना मुला-मुलींच्या कल्याणासाठी जोडीदार हुडकत असताना आपली जी फिरती होते, भटकंती होते ती स्थळे पहाण्यासाठीच होय. आयुष्याला जोडीदार कसा मिळावा यासाठी आपण स्थळे हुडकतो. तसे परमार्थात आपली साथ चांगल्या विचारांची आचारांची होण्यासाठी आपण धर्मस्तळावर जातो. तेथे गेल्यानंतर आपल्या मनावर एकप्रकारचे चैतन्य येते व आपले आचार विचार सुधारतात. यासाठी प्रापंचिकाने वर्षातून एकवेळ तरी धर्मक्षेत्रावर जावून यावे असे सांगितले आहे.
भारतासारख्या महाकाय खंडात 29 राज्ये आहेत. त्या राज्यात पसरलेली अनेक धर्मस्थळे आहेत. आपण राज्ये व तेथील धर्मस्थळांचा विचार करु…
भारतात 1. आंध्रप्रदेश, 2. अरुणाचल प्रदेश, 3. आसाम, 4. बिहार, 5. छत्तीसगड, 6. गोवा, 7. गुजराथ, 8. हरियाणा, 9. हिमाचल प्रदेश, 10 झारखंड, 11. कर्नाटक, 12. केरळ, 13. मध्यप्रदेश, 14. महाराष्ट्र, 15. मणिपूर, 16. मेघालय, 17. मिझोराम, 18. नागालँड, 19. ओरिसा, 20. पंजाब, 21. राजस्थान, 22. सिक्कीम, 23. तमिळनाडू, 24. तेलंगना, 25. त्रिपुरा, 26. उत्तरप्रदेश, 27. उत्तराखंड, 28. पच्शिम बंगाल, 29 चंदीगड अशा राज्यात असणारी विविध धर्मस्थळे आपण नावाने नजरेसमोर आणू .
महाराष्ट्र व तेथील धर्मस्थळे :
1. पंढरपूर : महाराष्ट्रामध्ये धर्माची स्थापना करणारे व आचरण संहिता साधणारे प्राचिन धर्मस्थळ म्हणून पंढरपूर समजले जाते. देशातील अनेक ठिकाणाहून वारीच्या रुपाने अनेक साधक या धर्मस्थळाला भेट देतात.
2. अक्कलकोट-स्वामी समर्थ, 3. तुळजापूर, 4. ब्रम्हचैतन्य गोंदावले, 5. सेवागिरीमहाराजांचे पुसेगाव, 6. कोल्हापूरची महादेवी, 7. ज्योतिबा, 8. बाहुबली-कुंभोज, 9. मोरगाव, 10. पाबळ, 11. आळंदी, 12. देहू, 13. पार्श्‍वप्रज्ञालय, 14. तळेगांव 15. नाशीक 16. सज्जनगड, 17. नांदगिरी, 18. शिरसवडी, 19. निगडीचे निजानंद महाराज, 20 पुसेसावळी, 20 जयरामस्वामी वडगांव, 21. धावडशी, 22. त्रिपुटी, 24. शिर्डी, 25. फलटण, 26. शेगांव -गजानन महाराज. याप्रमाणे अनेक इतर धर्मस्थळे आहेत. अशीच धर्मस्थळे इतर राज्यात पण पसरलेली आहेत. मनुष्य जन्म घेतल्यावर डोळ्यांनी या स्थळांचे दर्शन करावे वाटते.
जर प्रापंचिकाने नित्यनियमाने या धर्मस्थळाबद्दल विचार मनांत आणला तर त्याची यात्रा सफल होईल व त्याला आनंद लाभेल.
आयुष्यात धर्मस्थळांची साथ सोडू नका. तुमचे पापसंचय नष्ट करण्याची ताकद धर्मस्थळामध्ये आहे. याचा विसर पडू देऊ नका.

Leave a comment