पानं

🍃 पानं🍃

काही पानं भरावयाची असतात
(वही)

काही पानं वाढायची असतात
(जेवण)

काही पानं रंगवायची असतात
(खायची पानं)

काही पानं जाळायची असतात
(पालापाचोळा)

काही पानं जपायची असतात
( पिंपळ)

काही पानं कुटायची असतात
( पुदिना)

काही पानं लुटायची असतात

(आपटा)

काही पानं खुडायची असतात…
(चहाची पानं)..

काही पानं तोरणात सजवायची असतात..

(आंब्याची पाने)

काही पानं केसात घालायची असतात…

(केवड्याची पाने)

काही पानं जोडायची असतात
(पुरवणी)

काही पानं लपवायची असतात
(प्रगती पुस्तक)

काही पानं दुमडायची असतात तर काही नवीन उघडायची असतात.

( पानं सुख दुःखाच्या क्षणांची )
🌿

Leave a comment