आनंदी जीवनाची कला

कला हे माणसाच्या जीवन जगण्याचे साधन आहे.

या साधनाचा उपयोग करुन प्रत्येकजण आपले जीवन व्यतीत करीत असतो.

या कलेचे आधारावर तो आपले जीवन सुखी, समाधानी करण्याचा प्रयत्न करतो.

कुणाला गायन आवडते, कुणाला नाट्यकलेचा छंद असतो, कोण वकृत्व कलेत प्राविण्य मिळवितो, तर कुणी चित्रकलेने लोकांना आनंदी बनवितो.

याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या कलेच्या आधारावर माणूस आपले जीवनाचे नाटक सादर करीत असतो.

या सर्व कलामधून माणूस दुसर्‍याचे समाधान करुन स्वत: समाधानी होण्याचा प्रयत्न करतो.

हे नाटक वटवताना, तो प्रपंचात भिकारी असताना देखील  त्याला नाटकात आदर्श राजाचा रोल वठवावा लागतो.

याप्रमाणे जीवन जगताना जगण्याचे नाटक करीत असताना प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे. प्रत्यक्ष किती दु:ख कसे कमी करु शकतो, हे वागण्याचे नाटक करणे मोठी कला आहे व ही कला ज्या साधकाने अंगीकृत केली त्याला जीवन विद्या समजली.

जीवन जगण्याची कला आनंदी जीवनाची गुरु किल्ली ही आपण जाणून घेतली पाहिजे.

यासाठी कांही मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत.

1) आत्मविश्वास – त्यामध्ये अहंकार नसावा मी इतरांसाठी जे करेन ते श्रेष्ठ असेल. त्याला उपयोगी असेल. आनंद देणारे असेल.

2) अहंकाराला कोणत्याही क्षणी सोडण्याची मानसिकता बनविली पाहिजे.

3) आजची वेळ, आजची संधी ही माझी संधीचे सोने करणारी आहे हे जाणून त्या संधीकडे दुर्लक्ष न करता त्या संधीचा फायदा करण्याची मानसिकता मनामध्ये आली पाहिजे.

4) कोणतीही गोष्ट विचारांती  मी करु शकतो करेन असा विश्वास मनात हवा.

5) हे सर्व करीत असताना माझा परमेश्वर (महानशक्ती) माझे बरोबर आहे. त्याचे विरुद्ध मी कोणतेही काम करीत नाही.

त्या कामावर माझी नितांत श्रद्धा आहे हा भाव मनांत ठेवणे ही जीवन जगण्याची कला होय.

विवेकी माणसाने या पांच गोष्टी योग्यवेळी आचरणात आपल्या तर त्याला आनंदी जीवनाची कला संपादन झाली असे प्रमाणपत्र मिळू शकेल.

तसा प्रयत्न प्रत्येकाने करावा.

Leave a comment