जी आपल्याला आवडते
तिला आपण आवडत नाही
जिला आपण आवडतो…
ती आपल्याला आवडत नाही
आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…
तिने याच्यात काय पाहिलं
ह्याने तिच्यात काय पाहिलं
हे फक्त त्यानांच माहिती
बाकीच्याना कळत नाही
आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…
तो असे ना का सावळा
तिला त्यात शाम दिसतो
असेना का ती साधी
तिच्यात तो राधा पाहतो
दोघांमध्ये अस काय असत
तुम्हा आम्हाला कळत नाही
आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…
नसेल येत तिला जेवण करता
तुम्ही का उदास होता…
तो जेवतोय ना सुखाने
तुम्ही का चेहरा पाडता…
नवरा बायकोच अलवार नात
सासूला का कळत नाही
आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…
लेक गेली सासरी…
संसार तिला करू दे
तू कशाला काळजी करते
तिला तीच सावरू दे
लेकीच्या आयांना …
हेच कसं कळत नाही
आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…
प्रेम करा स्वतःवर अन
प्रेम करा जीवनावर…
दुसऱ्यात गुंतलात जर कधी
वेळीच या भानावर
हे इतकं साधं सोपं
कुणालाच कसं कळत नाही
आयुष्याचं हे गणित..
देवाला पण सुटत नाही…🌸
लिखावटी वरून बहुतेक पाडगावकर किंवा त्यांचा एखादा पंखा!